Thursday, November 6, 2008

पहिले पाऊल.

गेले काहि दिवस मराठी माणसाच्या आणि महाराष्ट्राच्या नावाने गळे काढणार्‍या उत्तर भारतीय नेत्यांचे बोल समस्त महाराष्ट्राने ऎकलेत व वर्तमान पत्रात वाचलेत. पराचा कावळा करणे. चोराच्या उलट्या बोंबा अशा बर्‍याच म्हणी यांना लागू करता येतील.
श्री. राजसाहेबांनी दिलेल्या हाकेला सगळ्या महाराष्ट्राने साथ दिली व यापुढेही दिली जाईलच. यातून एक मात्र लक्षात आले कि हे उत्तर भारतीय नेते कुठल्या थराला जाऊ शकतात.
याला उत्तर आपण देऊया. जात पात सर्व विसरुन सगळे मराठी माणसे एक झालीत तरच या उत्तर भारतीय गुंडगिरीला आळा बसेल.
मराठी माणसे एक झालीत तर कोणाला मारा-मारी करयची गरज नाही. कायदा हातात घ्यायचीपण गरज नाही.
आर्थिक बहिष्कार एक सर्वात मोठे शस्त्र आहे व आपल्या माणसाला मदत करणे हे दुसरे शस्त्र.
आपल्यालाही काही सुचत असल्यास navnirman.marathihit@blogger.com या पत्यावर ई-मेल पाठवा व मराठी हितरक्षणाला मदत करा.

No comments: